breaking-newsमनोरंजन

नवोदित अभिनेत्रीचा पोलीस ठाण्यातच विनयभंग

  • सहकारी अभिनेता अटक; दोन वर्षांपासून सुरू होता प्रकार

पुणे – पोलीस ठाण्याच्या वॉशरुम बाहेरच नवोदित अभिनेत्रीचा विनयभंग करण्याता प्रयत्न करणाऱ्या एका नवोदित अभिनेत्यास वानवडी पोलिसांनी अटक केली. संबंधितांविरुद्ध केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी दोघांना शनिवारी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी हा प्रकार घडला. संबंधित अभिनेता या अभिनेत्रीशी मागील दोन वर्षांपासून लगट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ती त्यास दाद देत नसल्याने त्याने तिला बदनामीची धमकी दिली होती.

सुभाष यादव (27, रा. शिवआराधना सोसायटी, शास्त्री रोड) असे अभिनेत्याचे नाव आहे. याप्रकरणी तुळजापूर येथील 23 वर्षीय अभिनेत्रीने फिर्याद दिली आहे. एका चित्रपटाचे मागील दोन वर्षांपासून राज्यात विविध ठिकाणी शुटिंग सुरू आहे. यादरम्यान सुभाषने अभिनेत्रीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तो फोन किंवा व्हॉटस्‌ अॅपवरुन तिच्याशी संपर्क साधत होता. त्याला अभिनेत्रीने प्रतिसाद दिला नाही. तरीदेखील सुभाष तिचा पाठलाग करत होता. धमकी देत असल्याने फिर्यादी अभिनेत्री त्याला भेटण्यासाठी चतुःशृंगी मंदिर परिसरात समजावण्यासाठी गेली होती.

तेथेही पुन्हा सुभाषने बदनामीची धमकी दिली. प्रकरण वाढू नये म्हणून अभिनेत्रीच्या वाहनचालकाने पोलिसांना फोनवरून तक्रार दिली. घटनास्थळी दोन पोलीस तत्काळ पोहचले. पोलिसांनी त्यांना लागलीच पांडवनगर पोलीस चौकीत नेले. त्यावेळी सुभाषने अभिनेत्रीची माफी मागितली. त्यामुळे अभिनेत्रीने त्यावेळी सुभाषविरुद्ध तक्रार दिली नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून सुभाषने तिला पुन्हा त्रास देणे सुरू केले. दरम्यान, सुभाषने एक व्हिडीओ व्हायरल केल्याची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात देऊन संबंधित अभिनेत्रीचा मोबाइल नंबर दिला होता. या तक्रार अर्जासंबंधात अभिनेत्रीला पोलिसांनी शनिवारी बोलावले होते. यावेळी सुभाषदेखील उपस्थित होता. तेथे पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे त्याने माफी मागण्याचा बहाणा करत पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलीस अधिकारी केबीनमध्ये गेल्यावर अभिनेत्री वॉशरुममध्ये गेली. तेव्हा सुभाषही तेथे आला, ती बाहेर येताच त्याने पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिने अखेर सुभाषविरुध्द विनयभंगाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी लागलीच त्याला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. पी. बागुल करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button