breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीचा बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत आता वाढ होताना दिसणार आहे. त्याची पत्नी आलिया सिद्दीकी उर्फ अंजना किशोर पांडेने लेखी तक्रार दाखल करून बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. याबाबतची तक्रार मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ताज्या माहितीनुसार, आलियाच्या तक्रारीवरून पोलिस आज एफआयआर दाखल करू शकतात.