नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता
आपल्या एकापेक्षा एक वेगळ्या भूमिकांसाठी अभिनेता परेश रावल हे ओळखले जातात. ते आगामी संजू चित्रपटातही सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसणार असून त्यानंतर परेश रावल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार होत असून सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु असे परेश रावल यांनीच सांगितले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणे खूप चॅलेंजिंग असणार असे देखील परेश रावल यांनी सांगितले आहे.
तसेच परेश रावल या चित्रपटाची निर्मितीही करणार असल्याचे म्हटले जात आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांचीही भूमिका ते साकारत असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये उरी छावणीवरच्या हल्ल्यानंतर11 दिवसातच भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील पाक तळांवर सर्जिकल स्ट्राईक करून या हल्ल्याचा बदला घेतला. या कथेवर उडी या नावाने चित्रपट बनविला जात आहे. त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांनी फार महत्वाची भूमिका बजावली होती. तो रोल परेश रावल साकारत आहेत.