breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
![The High Court rejected the petition of Sushant Singh Rajput's father](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Sushant-Singh-proud-of-Savdhaan-India-2-journey.jpg)
मुंबई | एमएस धोनी, छिछोरी आणि अनेक हिंदी चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.
सुशांतसिंग राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘काय पो छे!’ या चित्रपटात सुशांत मुख्य अभिनेता होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केलं होतं.
दरम्यान, आतापर्यंत सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. मुंबई पोलीस वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी पोहचले असून रिपोर्ट्सनुसार सुशांतच्या नोकरानं पोलिसांनी फोनकरून याबाबत माहिती दिली.