‘दीपिका’ला फिटनेस चॅलेंज स्विकारण पडलं महागात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/deepika-padukoen_64.jpg)
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिने बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचे चॅलेंज स्विकारत तिच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दीपिकाने धावतानाचा एक झिप व्हिडीओ पोस्ट केला आहे. काळ्या रंगाच्या ट्रॅकशूटमध्ये दीपिका मॉर्निंग वॉक करताना दिसत आहे.
ट्विटमध्ये दीपिकाने लिहिले की, ‘मी माझ्या फिटनेसविषयी खूपच उत्साहित आहे. आता माझे नवे ध्येय आहे रनिंग. थॅक्यू पीव्ही सिंधू… तुझे चॅलेंज मी स्विकारले आहे. आता मी मिताली राज, राणी रामपाल आणि आदिती अशोक यांना हे चॅलेंज देऊ इच्छिते. कारण आम्ही आम्ही फिट तर इंडिया फिट.’ फिटनेस चॅलेंजमध्ये भाग घेतल्याचा दीपिकाचा हा व्हिडीओ काही वेळातच सर्वत्र व्हायरल होत आहे. दीपिकाच्या या ट्विटचा सोशल मीडिया यूजर्सकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. तर काहींनी दीपिकाच्या या प्रामाणिक प्रयत्नाचे कौतुकही केले.