breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

दिशा सालियनच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या १५ दिवस आधी त्याची माजी मॅनेजर दिशा सालियननेही आत्महत्या केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असून हे प्रकरणही सीबीआयकडे सोपवण्यात यावं याकरता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला असून याचिका फेटाळून लावली आहे.

सुशांत आणि दिशाच्या आत्महत्यांचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी नाकारली, याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.

गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास करणाऱ्यांना फटकारले होते. या प्रकरणात सुनावणीसाठी कोणी का हजर नाही? मागील तारखेलाही कोणीच सुनावणीसाठी का हजर नव्हते? असे असेल तर न्यायालयाने काय करावे?, असे प्रश्न उपस्थित करत याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

पुनीत कौर धांडा यांनी वकिल विनीत धांडा यांच्यामार्फत न्यायालयात सदर याचिका दाखल केली असून, मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी सविस्तर चौकशी करावी, तसे निर्देश न्यायालयाने द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. या दरम्यान दिशाची केस फाईल हरवली आहे किंवा हटविली गेली आहे, असे म्हटले गेले होते. जर कोर्टाला हे असमाधानकारक वाटले तर, हा खटला पुढील तपासासाठी सीबीआयकडे पाठविला जावा, असे अपील धांडा यांनी न्यायालयात केले होते.

दिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने या घटनेच्या एका आठवड्यानंतर, 14 जून रोजी सकाळी आत्महत्या केली. त्यामुळे हे प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याची शंका येत असल्याचे या याचिकेत म्हटले होते. शिवाय, दिशा अभिनेता रोहन रायसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लॉकडाऊननंतर ते दोघे लग्न करणार होते, असा दावाही या याचिकेत करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button