breaking-newsमनोरंजन

दिशा पाटनीला जॅकपॉट, सलमानसोबत “भारत’मध्ये झळकणार

“बागी-2′ चित्रपटाच्या यशानंतर बॉलीवुड अभिनेत्री दिशा पाटनीला चित्रपट मिळत नसल्याची चर्चा होती. मात्र, आता तिच्या हाती जॅकपॉट लागला आहे. “भारत’ या बिग बजेट चित्रपटात सुपरस्टार सलमान खान आणि देशी गर्ल प्रियांका चोप्रासोबत ती झळकणार आहे. दिशा पाटनीने हा चित्रपट साईन केल्यास ही तिच्यासाठी मोठी संधी ठरेल.

चित्रपटातील ज्या भूमिकेसाठी दिशाला घेतल्याची चर्चा आहे, त्यासाठी श्रद्धा कपूरच्या नावाची चर्चा आहे. या दोघींपैकी कोणाचे नाव निश्‍चित होते याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. हा चित्रपट सलमान खानचा मोठा प्रोजेक्‍ट आहे. यात भारतातील 70 वर्षांचा इतिहासासह भारत-पाकिस्तानची दाखविण्यात येणार आहे. यासाठी पाक सीमेलगत चित्रिकरण करण्यात येणार आहे. यासाठी “भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर सीमा रेषाभागातील चांगल्या लोकेशनच्या शोधात आहेत.

अली अब्बास आणि सलमान खान या जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी “सुलतान’ आणि “टायगर जिंदा है’ यासारखी ब्लॅक बस्टर चित्रपट दिले आहेत. आता “भारत’ चित्रपट पुढील वर्षी ईदनिमित्त प्रदर्शीत करण्याचे नियोजन आहे. प्रियांका चोप्रा “भारत’ चित्रपटात दिर्घ काळानंतर बॉलीवूडमध्ये वापसी करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button