दिशा पटणी टॉलिवूडमध्ये जाणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/disha-patni-main.jpg)
आजकाल कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम मिळो अथवा न मिळो, पण टॉलिवूडमध्ये नक्की काम मिळते. टॉलिवूडमध्ये खऱ्याखुऱ्या कलाकारांची कदर केली जाते. बॉलिवूडमधील बहुतेक कलाकारांना टॉलिवूडच्या सिनेमांच्या ऑफर येतच असतात. “बागी 2’ची ऍक्ट्रेस दिशा पटणीलाही टॉलिवूडमधून ऑफर यायला लागल्या आहेत. तिला दक्षिणेकडच्या एका मोठ्या सिनेमाची ऑफर आली आहे. टॉलिवूडमध्ये “संघमित्रा’ या सिनेमासाठी दिशाला घेण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुंदर सी. हे करणार आहेत.
संघमित्रा नावाच्या एका सुंदर आणि लढाऊ राजकन्येच्या कथेवर हा सिनेमा आधारलेला असणार आहे. “संघमित्रा’चे शुटिंग जुलैमध्ये सुरू होणार होते. पण आता हे शुटिंग ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून त्याच्यासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. यात लीड रोलसाठी पहिल्यांदा श्रुती हसनची निवड झाली होती. आता श्रुतीच्या जागेवर दिशा पटणीची निवड झाली आहे.
दक्षिणेतील आर्य आणि जयम रवि सारखे बडे कलाकारही या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहेत. यासाठी दिशाला तलवारबाजी आणि घोडेस्वारीही शिकावी लागणार आहे. या ऑगस्टमध्ये शुटिंगला सुरुवात झाल्यावर पुढील वर्षी जून- जुलैच्या सुमारास “संघमित्रा’ रिलीज होणे अपेक्षित आहे. दिशा पटणीची टॉलिवूडमधील ही पहिलीच फिल्म असेल. त्यामुळे