breaking-newsमनोरंजन
दिलदार सलमान..! आला ‘तिच्या’ मदतीला धावून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/salman-khan-.jpg)
अभिनेता सलमान खानने ‘बिइंग ह्युमन’ या एनजीओच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. मात्र तो वैयक्तिक पातळीवरही लोकांच्या मदतीला धावून येतो. त्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका महिलेला मदतीचा हात दिल्याची माहिती एका बॉलिवूड साईटने दिली आहे.
सलमानचा ‘दस का दम’ हा टीव्ही शो पुन्हा येणार आहे. याचे शूटिंगही सुरू असून या कार्यक्रमाच्या सेटवर एक स्पर्धक महिला सलमानला तिच्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या अडचणींबद्दल सांगत होती. त्यावेळी ती अचानक खूप भावनिक होऊन बेशुद्ध पडली. पण, क्षणाचाही विलंब न करता सलमान तिच्या मदतीला धावून गेला आणि तिच्यावर उपचार केले. एवढेच नव्हे तर त्याने तिला आर्थिक मदतही देऊ केली. या महिलेला पैशांची गरज होती. यामुळेच ती कार्यक्रमात जिंकल्यास पैसे मिळतील या आशेने सहभागी झाल्याचे समजले.