breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांमध्ये सुशांतचा होणार सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/nsuonppg_sushant-singh-rajput_625x300_03_August_20-1.jpg)
मुंबई | दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला 2021 च्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केलं जाणार आहे. दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, हा सोहळा नेमका कधी होणार याची तारख जाहीर केलेली नाही.
या महिन्यात कॅलिफोर्निया स्टेट असेम्ब्लीतर्फे सुशांत सिंह राजपूतला मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्वीकारला होता. श्वेताने सोशल मीडिया याची माहिती देताना लिहिलं की, “भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्निया स्टेट असेम्ब्लीने माझ्या भावाला त्याच्या योगदानासाठी सन्मानित केलं.”