breaking-newsमनोरंजन

‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी रानू मंडल यांना सुनावलं

नुकताच रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक महिला चाहतीने रानू मंडल यांच्या हाताता स्पर्श करत सेल्फीसाठी विनंती केली होती. त्या महिलेने हाताला स्पर्श करणे रानू यांना आवडले नाही. ‘असा हाताला स्पर्श करुन आवाज का देता? काय आहे हे?’ असे म्हणत रानू यांनी त्या महिलेला सुनावले होते. रानू यांचे वेगळे वागणे पाहून महिला त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली.

रानू यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्या नेटकऱ्यांनी रानू यांना रातोरात स्टार केले त्याच नेटकऱ्यांनी रानू यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीसाठी फटकारले आहे. अनेकांनी रानू यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘ही तर प्रसिद्धीची हवा आहे, शिक्षण हे महत्वाचे असते, तुम्ही अशा कशा वागू शकता अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रानू यांना सुनावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button