breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचं लग्न?

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या मालिकांमधील एक म्हणजे ‘तुला पाहते रे.’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील विक्रांत सरंजामेची भूमिका साकारलेला सुबोध भावे आणि इशा निमकरची भूमिका साकारलेली गायत्री दातार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नुकताच गायत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती एका वधूच्या लूकमध्ये दिसत आहे.

खुद्द गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एखाद्या नवरी प्रमाणे अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. पण तिचा हा लूक पाहता ती लग्न बंधानात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच ती कोणाशी लग्न करते? तिचा लग्नसोहळा कुठे पार पडणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button