‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी भरघोस वाढ
अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्टारर सिनेमा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘छपाक’ रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आलेले आहेत. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकलाहि मागे टाकलेले आहे.
‘तान्हाजी’ प्रदर्शित होताच या सिनेमाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले. या सिनेमाने १५.१० कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 35 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडणार असेच दिसतंय. दमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेल्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ सिनेमामुळे पुन्हा अजयची जादू रसिकांवर झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा चित्रपट एकूण 4540 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता.