breaking-newsमनोरंजन

‘तानाजी’च्या निमित्ताने मिटला शाहरुख-अजयचा वाद?

बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता आणि खलनायकामध्ये ज्याप्रमाणे वाद होत असतात तसेच वाद त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील सुरुच असतात. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेता अजय देवगण यांच्यामध्ये देखील वाद झाले असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता हे सर्व वाद विसरुन शाहरुखने अजयला शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने अजय देवगणच्या १०० व्या चित्रपटानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने ट्विटरद्वारे अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘तानाजी’चे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर अजय देवगणच्या आता पर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या छोट्या-छोट्या फोटोंचे मिळून बनवलेले पोस्टर आहे.

अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत शाहरुखने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘माझा मित्र अजय देवगणचा आगामी चित्रपट आणि १००व्या चित्रपटाची मला उत्सुकता आहे. या १०० व्या चित्रपटासाठी तुला शुभेच्छा… तु चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठा प्रवास केला आहेस. तानाजी चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा’ असे शाहरुखने ट्विटमध्ये लिहिले होते.

Shah Rukh Khan✔@iamsrk

Here’s looking forward to another 100 and more films from my friend @ajaydevgn . All the best for this milestone…from striding atop two motorcycles at the same time…you’ve come a long long way….keep riding…and all the best for Tanhaji.

View image on Twitter

‘स्वराज्य’निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचे कतृत्त्व सोनेरी अक्षरात कोरले आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे होय. तानाजींच्या पराक्रमाची कथा ही चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनेता अजय देवगण ही कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे.

‘तानाजी’ या चित्रपटाचे १५० कोटी रुपयांचे बजेट आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे तर या चित्रपटात सैफ अली खानही असल्याच्या चर्चा आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र काही दिवसांपूर्वी प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. हा चित्रपट आता १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button