ड्रग्स प्रकरणी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांना एनसीबीकडून समन्स
मुंबई – ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधून अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना एनसीबीने समन्स बजावले आहे. येत्या तीन दिवसांत प्रत्येकाची चौकशी होणार आहे. दीपिका पादुकोण मुंबईत नाही, त्यामुळे ती 25 सप्टेंबरला एनसीबीसमोर जबाब नोंदवू शकते. रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांना उद्या एनसीबीसमोर हजर व्हावे लागेल. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान 26 सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर होतील.
यापूर्वी मंगळवारी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि KWAN टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांनाही समन्स बजावले होते, परंतु करिश्माची तब्येत ठिक नसल्यामुळे एजन्सीसमोर हजर होऊ शकली नाही. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले होते की, गरज भासल्यास दीपिकाला चौकशीसाठी बोलवलं जावू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित अमली पदार्थांविषयी व्हॉट्सअॅपवरील चॅट एजन्सीच्या तपासांतर्गत आहेत.
काय आहे चॅट?
D’ to K: तुमच्याकडे माल आहे का?
K’ reply: हो, पण घरी आहे, मी बांद्रामध्ये आहे.
K writes: जर तुम्हाला हवा असेल तर अमितला सांगते.
D writes: हो. प्लीज
K writes: अमित जवळ आहे, तो ठेवतो.
D writes: Hash ना?
D writes: गांजा नाही
K writes: कोको जवळ तू कधी येणार आहेस?
D writes: साडेअकरा ते 12 दरम्यान.