breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
ड्रग्ज प्रकरणात विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला क्राइम ब्रांचची नोटीस
सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरूमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत संजना गलरानी, रागिनी द्विवेदी, रवीशंकर अशा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. हे प्रकरण आता बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरापर्यंत पोहोचलं आहे. अलिकडेच विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा याला पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आता विवेकची पत्नी प्रियंका अल्वा हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.