breaking-newsमनोरंजन
डान्सर काका म्हणतायत ; गोविंदा माझे आयडॉल!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/uncle-dance-new.jpg)
गेल्या साधारण दोन- तीन दिवसांपासून एका काकांचा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. गोविंदा स्टाईल डान्स करून या काकांनी धमाल उडवून दिली आहे. ‘आप के आ जाने से’ या गाण्यावर हे काका डान्स करत आहेत. त्यांचा दुसरा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. संजीव श्रीवास्तव असे त्यांचे नाव आहे.
‘माझा व्हिडिओ व्हायरल होईल आणि लोकांना तो इतका आवडेल असे वाटलेच नव्हते. मी १९८२ पासून नाच करतो. गोविंदा हे माझे आयडॉल आहेत असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले’. तसेच माझा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचे आणि तो आवडणाऱ्यांचे मी आभार मानतो असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.