breaking-newsमनोरंजन

ट्रोलिंगविरोधात अनन्या पांडेची मोहीम

आजच्या काळात सोशल मीडिया ही अपरिहार्य गोष्ट आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात राहू इच्छिणाऱ्या, काहीतरी करू इच्छिणाऱ्या आजच्या काळातल्या कुणालाही सोशल मीडियाशिवाय जगणं, जगता येणं अशक्य आहे. सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत, तितके तोटेसुद्धा आहेत. ट्रोलिंग, धमकावणं यांसारख्या घटना सोशल मीडियावर सर्रास घडतात. या सर्वांविरोधात जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री अनन्या पांडेनं पुढाकार घेतला आहे. ‘सो पॉझिटिव्ह’ ही मोहीम अनन्याने सुरू केली आहे.

यासंदर्भात अनन्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘त्यांनी माझ्या दिसण्यावरून, चंकी पांडे यांची मुलगी असण्यावरून, अभिनय कौशल्यावरून, फॅशनवरून मला ट्रोल केलं. माझ्या कुटुंबीयांबद्दल, मित्र-मैत्रिणींबद्दल त्यांनी लिहिलं. एखाद्या मुलासोबत फोटो शेअर केला तर रिलेशनशिप स्टेटसवरून मतं बनवली गेली. माझ्या शिक्षणावरून प्रश्न उपस्थित केले गेले. जे मला ओळखतसुद्धा नाहीत, त्यांना माझ्यावर टीका करण्याचा काहीच हक्क नाही,’ असं तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावरील नकारात्मता कमी करून सकारात्मकता वाढवण्यासाठी अनन्याने ‘सो पॉझिटिव्ह’ ही मोहीम सुरू केली आहे.

Embedded video

Ananya Panday

@ananyapandayy

A part of growing up is taking responsibility & as a woke Millennial I, Ananya Panday introduce you’ll to my Digital Social Responsibility initiative ‘So+’ ❤️ @SoPositiveDSR
.
.

151 people are talking about this

या मोहिमेच्या माध्यामातून ‘डिजिटल सामाजिक जबाबदारी’ वाढवण्यासाठी काय करावं, ट्रोलिंगच्या घटनांना सामोरं कसं जावं यासंदर्भात ती चाहत्यांना सांगणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button