breaking-newsमनोरंजन

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

मुंबई :अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे मालिकेचे चित्रीकरण सपूर्णपणे ठप्प झाले आहे. मात्र, तब्बल  तीन महिन्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला आज (२६ जून) सुरुवात होत आहे.

या मालिकेतील सर्व कलाकार पुण्यातून मुंबईत आल्यानंतर जवळपास १५ दिवस कलाकार क्वारंटाईन होते. मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी नवीन भाग पाहाला मिळणार आहे.

दरम्यान,  राज्य शासनाने  काही अटी -शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी काल (२५ जून)  सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button