breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्याकडेही गुड न्यूज

मुंबई – क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुड न्युज दिल्या नंतर आता आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि त्याची पत्नी बॉलीवडू स्टार सागरिका घाडगे लवकरच आई-बाबा होणार आहेत.

या दोघांनी २०१७ साली लग्न केले होते. सध्या हे दोघेही युएईमध्ये आहेत. झहीर सध्या मुंबई इंडियन्स संघाचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स म्हणून काम करतोय. गुड न्यूजबद्दल अद्याप झहीर किंवा सागरिका यांनी काही सांगितेल नाही. पण मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, झहीर खान आणि सागरिका यांच्या मित्रांनी या गुड न्यूजला दुजोरा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी झहीर खानने युएईमध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा सागरिका देखील त्याच्या सोबत होती. मुंबई इंडियन्स संघाने वाढदिवस साजरा करत असलेला व्हिडिओ शेअर केला होता.

भारतीय क्रिकेटपटूमध्ये या वर्षी अनेक खेळाडूंनी गुड न्यूज दिल्या आहे. यामध्ये सुरेश रैना, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल आणि विजय शंकर यांचा समावेश होता. आता विराटने देखील अशीच गुड न्यूज दिली.

या वर्षी सुरेश रैनाला दुसरे बाळ झाले. रैनाला मार्च महिन्यात मुलगा झाला होता. त्याला २०१६ मध्ये पहिली मुलगी झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्याने विवाह आणि गुड न्यूज एकत्र दिली. काही दिवसांपूर्वी त्याला मुलगा झाला. तर चहल आणि विजय शंकर यांनी आयपीएलला रवाना होण्याआधी साखरपुडा उरकला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button