breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई
ज्येष्ठ कलावंत गुलाब संगमनेरकर यांना ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’
मुंबई : लोककला क्षेत्रात प्रदीर्घ कामगिरीसाठी राज्य सरकारच्या वतीनं प्रदान केला जाणारा मानाचा ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ कलावंत गुलाब संगमनेरकर यांना जाहीर झाला आहे.
सोबतच संगीत रंगभूमीवरील प्रदीर्घ कारकिर्दीसाठी दिला जाणारा ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जाहीर झाला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडेकर यांचे अभिनंदनही केले आहे.