Breaking-newsमनोरंजनमुंबई
ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/geeta-kapoo.jpg)
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे आज सकाळी ९ वाजता मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले. कमाल अमरोही यांच्या ‘पाकीजा’ सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. निर्माते अशोक पंडित यांनी गीता यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अशोक म्हणाले की, ‘आम्ही आमच्यापरिने सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण अखेर आज सकाळी ९ वाजता गीताजी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून त्या आपल्या मुलांची वाट पाहत होत्या. गीताजी यांना त्यांच्या मुलांना शेवटचे पाहायचे होते. पण त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली. कारण त्यांना भेटायला वर्षभरात कोणीच आले नाही. आज सकाळी ९.०० वाजता वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला.’