जेनेलिया डिसूजा-देशमुखची कोरोनावर यशस्वी मात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/genelia-d-souza_28.jpg)
मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांनंतर देशमुख कुटुंबातही कोरोनाने शिरकाव केला होता. अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. गेल्या २१ दिवसांपासून जेनेलिया क्वारंटाइनमध्ये होती. अखेर २१ दिवसांनंतर शनिवारी तिचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. जेनेलियाने काल सोशल मीडियावर पोस्ट लिहत हा अनुभव सांगितला.
‘तीन आठवड्यांपूर्वी माझा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. गेल्या २१ दिवसांत मला कोणतीच लक्षणे नव्हती. देवाच्या कृपेने आज माझा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. करोनाशी मी दिलेला लढा तसा फार कठीण नव्हता. मात्र मला ही गोष्ट कबुल करावी लागेल की क्वारंटाईनमध्ये घालवलेले ते २१ दिवस खूप आव्हानात्मक होते. कोणतीच गोष्ट त्या एकटेपणाला घालवू शकत नव्हती. आता पुन्हा एकदा कुटुंबीयांमध्ये, माझ्या प्रियजनांमध्ये परतल्याचा मला खूप आनंद होतोय. लवकरच चाचणी करून घेणे आणि पोषक आहार खाणे, तंदुरुस्त राहणे हाच कोरोनावर मात करण्याचा उपाय आहे’, असे जेनेलियाने म्हटले आहे.