जाणून घ्या ‘बदला’ची दोन दिवसांची कमाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/badla-box-office-759.jpg)
सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’ हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळत आहे. पहिल्या दिवशी जेमतेम कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत ‘बदला’ने एकूण १३.५९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
या थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.०४ कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी ८.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रविवारी जर या चित्रपटाने चांगली कमाई केल्यास तीन दिवसांत अंदाजे २३ कोटींपर्यंत कमाई जाऊ शकते. त्यामुळे बिग बींचा हा चित्रपट हिट ठरतोय असं म्हणायला हरकत नाही.
#Badla records superb growth on Day 2… Metros/multiplexes are rocking… Day 3 [Sun] will score higher numbers… Eyes ₹ 23 cr [+/-] opening weekend
‘बदला’ हा चित्रपट ‘द इनव्हिसिबल गेस्ट’ या स्पॅनिश चित्रपटाला रिमेक आहे. क्षणाक्षणाला ट्विस्ट घेणारं कथानक, अत्यंत नेमकी पटकथा, अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि अमृता सिंगसारख्या कलाकारांचा जबरदस्त अभिनय आणि दिग्दर्शनाच्या जोरावर चित्रपट दोन तास खुर्चीला खिळवून ठेवतो. बिग बी आणि तापसी यांचा हा एकत्रितपणे दुसरा चित्रपट आहे. याआधी ‘पिंक’ चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं.