जस्टिन बीबर लढतोय ‘ह्या’ गंभीर आजाराशी…फॅन्ससाठी वाईट बातमी…
आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबरचे कोट्यवधी फॅनस् आहेत. पण सध्या जस्टिन बीबरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याला झालेल्या एका आजाराबाबत माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जस्टिन लाइम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. जस्टिनने सांगितले की, या आजाराचा त्याची त्वचा, मेंदू, एनर्जी आणि पूर्ण आरोग्यावर परिणाम होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्येच जस्टिन बीबरने त्याचं दुःख व्यक्त केलं.
जेव्हा लोक म्हणतात की बीबर खराब दिसतो तेव्हा त्यांना हे कळत नाही की मी लाइम आजाराने ग्रस्त आहे. लोकांना हे कळत नाही की, क्रोनिक मोनोचा माझ्या त्वचा, मेंदू आणि एनर्जीवर परिणाम होतो. एवढं असूनही मी लढत आहे. या आजाराबद्दलची माहिती जस्टिन बीबर यूट्यूबवर प्रदर्शित होणाऱ्या डॉक्यूमेण्ट्रीमध्ये देणार आहे., या आजारातून बाहेर पडण्याचा आणि पूर्ण बरा होण्याचा तो प्रयत्न करत असल्याचंही त्यानं सांगितलं. त्यालाही टोपी न घालता प्रेक्षकांच्या समोर यायचं आहे.
लाइम हा एक संसर्गजन्य रोग आहे. बोरेलिया बर्गडोरफेरी या बॅक्टेरियामुळे हा रोग होतो. हा संसर्गजन्य रोग ब्लॅकलेड टिक चावल्यामुळे होतो. या आजारात रुग्णाला ताप येणं, त्वचेवर चट्टे उमटणं, डोकेदुखी आणि सूज येणं यांसारख्या गोष्टी सतत होत असतात…