Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
छोट्या पडद्यावरील अभिनेता राहुल सुधीरला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/राहुल-सुधीर.jpg)
मुंबई – मार्च महिन्यापासून देशात कोरोनाने थैमान सुरु आहे. आतापर्यंत अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राहुल सुधीर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः राहुलने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली.
राहुल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून इश्क में मरजावां 2 या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे. या मालिकेत राहुल वंश राय सिंघानिया या मुख्य भूमिकेत झळकत आहे. याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्याने कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मी सध्या होम क्वारंटाइन असल्याचे त्याने इंस्टाग्राममधील पोस्टमध्ये सांगितले आहे.