breaking-newsआंतरराष्टीयमनोरंजन

चीनमधील प्रेक्षकांचीही ‘टॉयलेट’ला पसंती; जोरदार कमाई

बीजिंग : शौचालय किती आवश्यक आहे, हे सांगणारा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट भारतात नुकताच प्रदर्शित झाला. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मात्र, आता हा चित्रपट चीनमध्ये देखील मोठे यश मिळवताना दिसत आहे. ११ हजार ५०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर यांचा चित्रपट नुकताच चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. चीनमध्ये ‘टॉयलेट हीरो’ या नावाने प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच हिट ठरत आहे.

चीनमध्ये पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्‍ला जमवला. चित्रपटाने २.३६ दशलक्ष डॉलर्स अर्थात साधारण १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button