चित्रपट माझ्या जीवनाचा हिस्सा, जीवन नव्हे – रविना टंडन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/ravina-tandon-.jpg)
बॉलीवूडमधील नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री रविना टंडनचे म्हणणे आहे की, चित्रपट हे तिच्या आयुष्यातील एक भाग आहे. चित्रपट म्हणजे माझे जीवन नाही. दरम्यान, तिच्या समकालीन वेळच्या अभिनेत्री काजोल, जूही चावला, माधुरी दीक्षित यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. मात्र, रविना टंडनचे मत आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी एक निश्चित वेळ असते.
रविना टंडन म्हणाली, जेव्हा माझ्याकडे अनेक चित्रपट होते तेव्हा मी शंभर टक्के योगदान दिले. त्यानंतर मी माझ्या कुटुंबाला आणि अन्य गोष्टींना महत्त्व दिले. तसेच काळानुसार गोष्टी बदलतात. मला माझे वैयक्तिक आयुष्य जगायचे होते. चित्रपट माझ्या जीवनाचा हिस्सा, जीवन नव्हे, असे तिने सांगितले.
मला “चश्मे बद्दूर’ आणि “क्या कूल है हम’ यासारख्या अनेक चित्रपटांची ऑफर आली होती. मात्र चित्रपट निवडण्यात मी कधीही घाई केली नाही. मला वाटते, प्रत्येक कलाकाराने त्याच्या वयानुसार बदलले पाहिजे.रविना टंडनचा 2017मध्ये “मातृ’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने अभिनेत्री तिची संजय गांधी नॅशनल पार्कच्या ब्राडं अंम्बेसडर म्हणून निवड झाली आहे. रविना टंडनला लहानपणापासूनच वन्यप्राणांबाबत जिव्हाळा होता.