Breaking-newsमनोरंजन
गणेश आचार्य यांना धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/ganesh-acharya-.jpg)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गणेश आचार्य यांना डान्सर फेडरेशनच्या दोन सदस्यांनी धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदी आणि मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यांनी एबीसीडी या चित्रपटात अभिनयही केला आहे. त्यांना काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी मिळत होती. डान्सर फेडरेशनच्या दोन सदस्यांनीच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली हे आता उघड झाले आहे. त्यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी ते देत होते. अखेर गणेश आचार्य यांनी अंधेरी पश्चिम येथील आंबोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केलीये. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस याबद्दल तपास करत आहे.