breaking-newsमनोरंजन

‘खली बली’ गाण्यावर स्पायडर मॅन आणि डेडपूलने धरला ठेका

ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पद्मावत’चा रंग अजूनही प्रेक्षकांवर असल्याचे बघावयास मिळत आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये सर्वांत मोठा सुपरहिट ठरला आहे. चित्रपटात अभिनेता रणवीरने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने ‘खली बली’ या गाण्यावर जबरदस्त डान्सही केला होता. त्याचे हे गाणेदेखील चांगलेच सुपरहिट ठरले आहे. या गाण्याची भुरळ अमेरिकेचे सुपरहिरो डेडपूल आणि स्पायडर मॅन यांनाही पडल्याचे दिसत आहे.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये डेडपूल आणि स्पायडर मॅन रणवीरच्या या गाण्यावर जबरदस्त ठेका धरताना दिसत आहेत. दोन्ही सुपरहिरोंचा हा डान्स खरोखरच मजेशीर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button