क्रिकेटपटू पृथ्वी शॉ “या ” अभिनेत्रीच्या प्रेमात झाला “क्लीन बोल्ड”
मुंबई | प्रतिनिधी
वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका अभिनेत्रीसमोर क्लीन बोल्ड झाला आहे. खरे तर बातमी अशी आहे की पृथ्वी शॉ सध्या अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत आहे. शॉप्रमाणेच प्राचीही मुंबईची आहे.
२०व्या वर्षी पृथ्वी शॉ फलंदाजीत दमदार कामगिरी करताना दिसतो आहे. त्याच्या कामगिरीमुळे काही तरूणीही त्याच्या फॅन होताना दिसत आहेत. नुकतीच शॉ याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून तो अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
प्राची सिंहशी असे जोडले पृथ्वी शॉचे नाव:
पृथ्वी शॉ आजकाल अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. वास्तविक शॉच्या सोशल मीडियावर अशा काही कमेंट्स पाहायला मिळाल्या आहेत, त्यानंतर शॉचे नाव प्राचीशी जोडले जात आहे.
पण पृथ्वी शॉ आणि प्राचीला बर्यारच जणांनी जवळचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. तसे, आम्ही आपणास सांगतो की प्राची देखील पृथ्वी शॉच्या प्रत्येक पोस्टवर नक्कीच कमेंट देत असते आणि शॉ देखील प्राचीच्या प्रत्येक कमेंटला प्रत्युत्तर देण्यास विसरत नाही.
जाणून घ्या प्राची सिंह कोण आहे?
प्राची सिंह एक अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने कलर्स टीव्हीच्या प्रसिद्ध सीरियल उडानमध्ये काम केले आहे. तसे, प्राची देखील एक मॉडेल आहे. तिच्या अभिनयाबरोबरच प्राची तिच्या जबरदस्त बेली डान्ससाठीही ओळखली जाते. तसे बॉलिवूड आणि क्रिकेटर्स यांच्यात खूप जुने नाते आहे.