Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘क्राइम पेट्रोल’मधील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन
सोनी वाहिनीवरील ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते शफीक अंसारी यांचे रविवारी निधन झाले. ५२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मागील काही दिवसांपासून अंसारी यांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे म्हटले जाते. शफीक अंसारी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिने आणि टीव्ही कलाकार संघटना (CINTAA)ने सोशल मीडियाद्वारे शफीक अंसारी यांच्या दुख:द निधनाची माहिती देत श्रद्धांजली वाहिली. २००८ पासून शफीक हे CINTAAचे सदस्य होते.
#CINTAA expresses it's deepest condolence on the demise of Mr. Ansari Shafique (Member since : June 2008)@DJariwalla @sushant_says @amitbehl1 @sanjaymbhatia @SuneelSinha @deepakqazir @NupurAlankar @abhhaybhaargava @JhankalRavi @rakufired @neelukohliactor @RajRomit pic.twitter.com/4aoZVesxLF
— CINTAA_Official (@CintaaOfficial) May 10, 2020