“क्यो की ग्रीक भी कभी हिंदोस्थानी थे” ही मालिका आली तर,एकताचं महाभारत स्विकारेल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-27.png)
भारताचा पहिल्या फळीतील सूपरहिरो ‘शक्तिमान’चं टीव्हीवर पूनर्प्रक्षेपण सुरु आहे. ९० च्या दशकातील ही सर्वात गाजलेली मालिका होय. लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आत्ताच्या नव्या पिढीसाठी मुख्य अभिनेता मुकेश खन्ना यांना ‘शक्तिमान’ नव्या रुपात पुन्हा टीव्हीवर आणायचं आहे, मात्र या मालिकेच्या निर्मितीसाठी मी कधीही एकता कपूरकडे जाणार नाही कारण तिनं महाभारताचा खून केला आहे असा टोला मुकेश यांनी लगावला.
एकता कपूरनं २००८ मध्ये ‘महाभारत’ मालिकेची निर्मीती केली. काही कारणानं ही मालिका बंद झाली. मात्र एकतानं अयोग्य पद्धतीनं ही मालिका लोकांसमोर ठेवली असा आरोप मुकेश यांनी केला आहे. ‘तिनं द्रोपदीच्या खांद्यावर टॅट्यू काढला. तिनं मॉर्डन लोकांसाठी महाभारताची निर्मिती केली, पण मी तिला एकच सांगेन संस्कृती कधी मॉर्डन होत नसते मुली, ज्यादिवशी तू संस्कृतीला मॉर्डन करण्याचा प्रयत्न करशील त्याच दिवशी ती नष्ट झाली असेल. जर क्यो की ग्रीक भी कभी हिंदोस्थानी थे अशी मालिका आली तर मी नक्कीच एकताचंही महाभारत स्वीकारलं असतं असा टोला मुकेश यांनी मुंबई मिररशी बोलताना लगावला.