breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कभी खुशी कभी गम चित्रपटाच्या वेळी काजोलचा झाला होता गर्भपात…

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने मुलगी न्यासाचा जन्म होण्याआधी आपला दोन वेळा गर्भपात झाला होता असा खुलासा केला आहे. काजोलने एका मुलाखतीत आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक घटनांचा उलगडा केला. यावेळी तिने आपली आणि अजय देवगणची पहिली भेट तसंच त्याचं प्रेमात झालेलं रुपांतर आणि लग्न यासंबंधी सांगितलं आहे. मात्र यावेळी तिने पहिल्यांदाच आपला दोन वेळा गर्भपात झाल्याचा खुलासा करत आपल्या आयुष्यातील त्या खडतर प्रवासाबद्दल सांगितलं.

“२००१ मध्ये कभी खुशी कभी गम चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मी गर्भवती होती. पण माझा गर्भपात झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत होता तेव्हा मी रुग्णालयात होते. माझ्यासाठी ती आनंदाची वेळ नव्हती. त्यानंतर माझा अजून एकदा गर्भपात झाला. माझ्यासाठी तो खपूच कठीण काळ होता,” असं काजोलने मुलाखतीत सांगितलं आहे.

काजोल आणि अजय देवगण तान्हाजी चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याआधी त्यांनी ‘इश्क’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’, ‘राजू चाचा’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

अजय देवगणसोबत झालेल्या पहिल्या भेटीची आठवणही काजोलने शेअर केली आहे. “२५ वर्षांपूर्वी हलचल चित्रपटाच्या सेटवर आमची पहिली भेट झाली. मी शूटसाठी तयार झाले होते आणि विचालं माझा हिरो कुठे आहे ? कोणीतरी अजयकडे बोट दाखवलं. तो एका कोपऱ्यात शांतपणे बसला होता. त्याला भेटण्याच्या १० मिनिटं आधी मी त्याच्याबद्दल गॉसिप करत होते. सेटवर आम्ही बोलू लागलो आणि लगेच आमच्यात मैत्री झाली,” अशी आठवण काजोलने सांगितली आहे.

“आम्ही दोघंही त्यावेळी वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते. मी अजयकडे माझ्या प्रियकराची तक्रारदेखील केली होती. पण लवकरच आमच्या दोघांचाही ब्रेक अप झाला. आमच्या दोघांपैकी कोणीही प्रपोज केला नाही, पण आपण एकत्र आहोत हे दोघांनाही माहिती होतं. हात पकडण्यापासून सुरु झालेलं नातं आम्हाला कळण्याआधी फार पुढे गेलं होतं,” असं काजोलने सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button