Breaking-newsमनोरंजन

कपिल शर्माच्यारोलमध्ये कृष्णा अभिषेक

एकापाठोपाठ एक करून बायोपिकची घोषणा व्हायला लागली असताना आता कॉमेडी ऍक्‍टर कपिल शर्मावरही बायोपिक बनण्याची तयारी झाली आहे. कपिल शर्माने मोठ्या सिनेमांमध्ये फार काम केलेले नसले तरी त्याच्या नावावर “कपिल शर्मा शो’चे मोठे यश जमा आहे. याशिवाय कपिलच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप उतार चढाव येऊन गेले आहेत. त्यासगळ्याचा परामर्श त्याच्यावरील सिनेमामध्ये घेतला जाणार आहे. पुढील आठवड्यात “तेरी भाभी है पगले’ हा एक कॉमेडी सिनेमा रिलीज होतो आहे. या सिनेमाचे डायरेक्‍टर विनोद तिवारी यांनाच कपिल शर्माच्या बायोपिक करायचा आहे. राजकुमार हिरानी यांच्या “संजू’ बघितल्यावर तिवारी यांना कपिलच्या बायोपिकची कल्पना सुचली. कपिलवरील सिनेमासाठी काही निर्मातेही तयार झाल्याचे तिवारीनी सांगितले. कपिलच्या रोलसाठी कोणाला घ्यायचे हा मोठा प्रश्‍न आहे. कपिल स्वतःच हा रोल करू शकेल. कृष्णा अभिषेक हा कपिलच्या रोलसाठी फिट होऊ शकेल. कपिल प्रमाणे कृष्णा अभिषेकचे कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. कपिलच्या रोलला न्याय देण्याची त्याची क्षमता आहे, असेही तिवारी म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button