breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
कन्नड दिग्दर्शक विजय रेड्डी यांचे निधन
बंगळुरू – कन्नड सिने इंडिस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक विजय रेड्डी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. शनिवारी सकाळीच त्यांचा मुलगा त्रिपन रेड्डी यांनी ही माहिती दिली.
विजय रेड्डी यांनी आतापर्यंत कन्नड भाषेत ५० सिनेमे दिग्दर्शित केले. १९७० साली आलेला रंगमहल रहस्य हा चित्रपट तुफान गाजला होता. ११९७३ साली त्यांच्या करिअरला दिशा मिळाली. गधडा गुड्डी या चित्रपटाने त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले.