कंगना रणौत आणि जयललिता यांच्यात हुबेहुब साम्य…पहा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-159.png)
जेव्हापासून कंगना रणौतच्या थलायवी सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून तिच्या चाहत्यांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता स्पष्टपणे दिसते. या सिनेमात कंगना माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या निर्मात्यांनी कंगना आणि एमजीआरचा लुक शेअर केला होता. आज जयललिता यांच्या जयंतीनिमित्त कंगनाचा अजून एक लुक शेअर करण्यात आला…या लुकमध्ये कंगना हुबेहूब जयललिता यांच्यासारखी दिसते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/thalaivi_kangana_ranaut_shares_glimpse_of_her_look_wishes_hair_stylist_on_completing_50_years_in_bollywood_0.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/qwe-1024x683.jpg)
ब्लॅक अँड व्हाइट बॉर्डरच्या साडीतीलकंगनाचा हा लुक तेव्हाचा आहे जेव्हा जयललिता बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार होत्या. हा लुक कंगनाची बहीण रंगोली चंडेलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-44.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/kangana-1.jpeg)
एवढंच नाही तर कंगनाचे हावभावही जयललिता यांच्याशी मिळते- जुळते आहेत. सोशल मीडियावर हा फोटो शेअर होताच अनेकांनी कंगनाच्या या लुकचं कौतुक केलं. या सिनेमाबद्दल कंगना म्हणाली की, “मणिकर्णिकानंतर हा माझा दुसरा बायोपिक आहे. अशा सशक्त महिलेची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं ही फार सन्माननिय गोष्ट आहे. त्यांची व्यक्तिरेखा फार वेगळी होती. अशा पद्धतीची व्यक्तिरेखा मी यापूर्वी कधी वठवली नव्हती.”