breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कंगनाविरोधात गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे निर्देश

बंगळुरु – केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रानौतविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. कर्नाटकमधील तुमकुरच्या न्यायालयाने क्यथसांद्रा पोलीस स्टेशनला कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ररमेश नाईल एल. यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

कंगनावर केंद्राच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी याचिकाकर्त्यांनी पुरावे म्हणून न्यायालयासमोर कंगनाचे काही ट्विटही सादर केले होते. या याचिकेत कंगनावर इतरही अनेक आरोप करण्यात आले आहेत.

https://twitter.com/KanganaTeam/status/1307640690868805635?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1307640690868805635%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=http%3A%2F%2Fenavakal.com%2Fcourt-direct-police-to-register-fir-against-actress-kangana-ranaut%2F

रमेश नाईल एल. यांनी न्यायालयात याचिका दाखल करत कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेत म्हटलं होतं, “कंगनाने दंगल होण्यासाठी युवकांशी संबंधित चिथावणीखोर वक्तव्यं केली. त्यामुळे कंगनाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 153 अ, 504, 108 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.” न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या मागण्या मान्य करत पोलिसांना कंगनाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button