एका युझरच्या प्रश्नावर चांगलेच भडकले बिग बी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Untitled-1.png)
महानायक बिग बींना कोरोनावर मात करून नुकतेच घरी परतले आहेत. परतल्यावर एका युझरने त्यांना वेगळाच प्रश्न विचारला त्यावर बिग बी चांगलेच भडकलेले पहायला मिळालं. अमूलने पोस्टरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांना कोरोनावर मात करून आल्यामुळे शुभेच्छा दिल्या. अमिताभ यांनी अमूलचं पोस्टर शेअर करून आभार व्यक्त केले. अनेक वर्ष अमूल सन्मानित करत आहेत. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला ‘अमूल्य’ बनवलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-9-1024x693.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/amitabh1_5f291207415ec-1024x477.jpg)
याच दरम्यान एका युझरने जाहिरातीवर म्हटलं की,’कमीत कमी रुपयात थोडी अमुल्य बनले असाल. याकरता काही रक्कम आकारली असेल. दरवर्षी ही रक्कम वाढली असेल.’ अमिताभ युझरच्या बोलण्यावर रागावले. या युझरला उत्तर देताना बिग बी म्हणाले की, सत्य माहित नसेल तर बोलू नये’. ‘खूप मोठा गैरसमज आहे. जर खरं माहित नसेल तर स्वच्छ तोंड स्वच्छच ठेवावं. नाही तर ते तुमच्यावर येऊन कोसळेल. जसं आता झालं. ‘