breaking-newsमनोरंजन
ऋषभ पंतच्या फलंदाजीवर ‘ही’ अभिनेत्री झाली फिदा…
बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातील नाते काही औरच आहे. जेव्हा-जेव्हा एखादी अभिनेत्री क्रिकेटपटूचे कौतुक करताना दिसली की, लगेचच त्यांच्यातील अफेअरवरून जोरदार चर्चाही रंगते. एका बॉलिवूड अभिनेत्रीने आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्सकडून खेळणाऱ्या फलंदाज ऋषभ पंत याचं कौतुक केलं आहे. या सीजनमध्ये ऋषभचा जबरदस्त परफॉर्मन्स बघावयास मिळाला.
‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यासारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणाऱ्या अभिनेत्री नुसरत भरूचा हिने ऋषभच्या बॅटिंगचे तोंडभरून कौतुक केले. तिने तिच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर लिहिले की, ‘६३ चेंडूमध्ये १२८ धावा, ऋषभ पंत… जबरदस्त खेळ, बघून मजा आली. केवळ त्याची इनिंग बघण्यासाठी मी हायलाइट्स पुन्हा बघितले. नुसरतचे ट्विट ऋषभनेदेखील रिट्विट करत स्माइलच्या इमोजीसह थॅँक्यू असे लिहिले.