breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

ईदला ‘भाईजान’चा नवा चित्रपट येतोय…नाव काय महितीय?

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

हिंदी चित्रपट सृष्टीतील ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान प्रतिवर्षी प्रमाणे ईदनिमित्त आपल्या चाहत्यांसाठी नवा चित्रपट घेवून येणार आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या ईदला ‘कभी ईद कभी दिवाळी’ हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. त्याच्या शिर्षकाचे सलमानने शुक्रवारी ‘रिलिझ’ केले.

ईद-अल-फित्र एन्जॉय करण्यासाठी आपल्या चाहत्यांना सिनेमा भेट म्हणून देण्याच्या ‘ट्रेंड’ सुपरस्टार सलमान खान याने  सुरू केला. सलमानने शुक्रवारी ‘ट्विटर’वर घोषणा केली की, त्याचा पुढचा चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाळी’ हा २०२१ मध्ये होणाऱ्या ईदला चित्रपटगृहात झळकणार आहे. हा सिनेमा २१ मेच्या सुमारास प्रदर्शित होईल. चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियाडवाला आहेत.

ब्लॉकबस्टर हिट ‘दबंग’ ‘च्या यशस्वी प्रदर्शनानंतर ‘ राधेः तुम्हारा मोस्ट वांटेड भाई ‘या चित्रपटाचे प्रदर्शन येत्या मे महिन्यात ईदवर होणार आहे. नृत्यदिग्दर्शक-दिग्दर्शक प्रभू देवा या चित्रपटाचे हेल्मिंग करीत असून, सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांनी सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रोडक्शन आणि रील लाइफ प्रॉडक्शन या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button