Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘आश्रम’ वादाच्या भोवऱ्यात; बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना कोर्टाची नोटीस
![‘Ashram’ in the midst of controversy; Court notice to Bobby Deol and Prakash Jha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/आश्रम.jpg)
आश्रम ही वर्षातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिजपैकी एक म्हणून चर्चेत आहे. अलिकडेच या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला. या सीझनवर देखील प्रेक्षक आणि समिक्षकांनी कौतुकांचा वर्षाव केला. मात्र ही सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जोधपूर सत्र न्यायालयानं आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे.
जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी आश्रम सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या सीरिजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोप त्यांनी केला.
शिवाय या सीरिजवर बंदी घालण्यासाठी त्यांनी जोधपूर सत्र न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. या प्रकरणी बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणावर येत्या ११ जानेवारीला सुनावणी होणार आहे.