Breaking-newsमनोरंजन
‘आराध्या भविष्यात होणार देशाची पंतप्रधान’ ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Aaradhya_Bachchan-.jpg)
”अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची कन्या आराध्या ही भविष्यात देशाची पंतप्रधान होऊ शकते,” असे ज्योतिषी डी. ग्यानेश्वर यांनी म्हटले आहे. आराध्याचे नाव बदलून ‘रोहनी’, असे ठेवल्यास याच तिला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी आणि थलैवा रजनिकांत राजकारणात प्रवेश करतील ही आपली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी अशा अनेक भविष्यवाण्या केल्याचे वृत्त आहे. निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड ही आपली भविष्यवाणीही खरी ठरल्याचेही ते म्हणाले.