breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अमृता फडणवीसांच्या गाण्याला लाईक्सपेक्षा डिस्लाईक जास्त

मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणं सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केलं. या गाण्यावर सर्वच स्तरांतून टीका करण्यात येत आहे. स्त्रियांना समर्पित असे असलेल्या या गाण्यातून उत्तम संदेश मांडलाय मात्र, अमृता यांचा आवाज बेसूर असल्याची टीका सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. त्यामुळे टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवरील या गाण्यावर डिस्लाईकचा पाऊस पडला आहे.

अमृता फडणवीसांचे हे भाऊबीज स्पेशल गाणं टी- सिरीज मराठी या युट्यूब अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलं आहे. मात्र या गाण्याला मागील पाच दिवसांमध्ये १८ हजारांहून अधिक डिस्लाइक मिळाले आहेत. तर या गाण्याला लाईक करणाऱ्यांची संख्या एक हजार ९०० असल्याचे या चॅनेलवरील व्हिडीओखालील लाईक,डिस्लाइकच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहेत. मात्र त्याचवेळी हे गाणं सहाव्या क्रमांकाला ट्रेण्ड होत असल्याचे बुधवारी दिसून आलं.

याचबरोबर या व्हिडीओवर तीन हजारहून अधिक कमेंट आल्या असून अनेकांनी गाण्याच्या माध्यमातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला असला तरी अन्य एखादी गायिका असती तर गाणं आणखीन प्रभावशाली वाटलं असतं अशापद्धतीची मतं नोंदवल्याचे पहायला मिळत आहे.

अमृता यांनी भाऊबीजेच्या दिवशी या गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता. “आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या” असं म्हणत त्यांनी त्यांचं नव्या गाण्याचा छोटा व्हिडीओ आणि मूळ गाण्याची युट्यूब लिंक ट्विट केली होती.

त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच मंगळवारीच अमृता यांनी ट्विटवरुन या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाल्याचं सांगत प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले होते. “महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांमध्ये या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन लवकरच मी पुन्हा येईन,” असं अमृता यांनी ट्विट केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button