अमिताभ बच्चनना “ऍव्हेंजर्स’ समजलाच नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/amitabh-bachcha.jpg)
अमिताभ बच्चन यांनी शनिवारी हॉलिवूडचा “ऍव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर’ हा सिनेमा बघितला. मात्र त्यांना हा सिनेमा समजलाच नाही. त्यांनी स्वतः ट्विटरवरच्या पोस्टमध्ये याचा खुलासा केला आहे. त्यांनी चक्क “ऍव्हेंजर्स…’ची चेष्टा केली. या सिनेमामध्ये नक्की काय चालले आहे, ते समजलेच नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या या पोस्ट नंतर सोशल मिडीयावरून “बिग बी’ना ट्रोल करायला सुरुवात झाली.
काही युजर्सनी अमिताभ आणि अभिषेक बच्चनच्या फ्लॉप सिनेमांची यादी दिली आणि हे सिनेमेही आपल्याला समजले नव्हते, असे ऐकवले. तर “ऍव्हेंजर्स : इनफिनिटी वॉर’ समजण्यासाठी या सिनेमाचा पहिला भाग बघायला पाहिजे, असा सल्लाही काही जणांनी दिला. तर हा सिनेमा जर हिंदीमध्ये बघितला असता, तर कदाचित समजला असता, असे म्हणून एकाने तर अमिताभ यांच्या इंग्रजीच्या ज्ञानाचेच वाभाडे काढले.
बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये “एक पिक्चर देखने गाए’ असे म्हटले होते. ही व्याकराणातील द्चूक एकाने लक्षात आणून दिली आणि “गए’ आणि “गाए’मध्ये काय फरक असतो, हे बच्चन यांना माहित असावे अशी पुस्तीही जोडली.