breaking-newsमनोरंजन

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसहॉलिवूड अभिनेत्रीसोबत करणार पॉडकास्ट शो

जॅकलीन फर्नांडीस आता एका नव्या पॉडकास्ट शोसाठी सज्ज झाली आहे. यासोबत तिला हॉलिवूड अभिनेत्री अमांडा सेर्नी साथ देणार आहे. ‘फील्स गुड’ असं या तिच्या पोडकास्टचं नाव असणार असून यामध्ये जगभरातील प्रेरणादायक बातम्या, समीक्षा असणार आहेत.

या शोमध्ये डेटिंग, वेलनेस आणि संस्कृति यांवरच्या चर्चा असून यातील कंटेंट दर्शकांना सकारात्मकतेच्या अंगाने नेणारा असेल. या शोची घोषणा पॉडकास्ट मंचावरील प्रसिद्ध पॉडकास्ट वनद्वारे करण्यात आली आहे.

या शो विषयी बोलताना जॅकलिन आणि अमांडा म्हणाल्या की,”आम्ही जे करतो ते आम्हाला आवडते आहे आणि वेलनेस, संस्कृति, डेटिंग, सकारात्मक बातम्यांसोबत कधी कधी अनपेक्षित पाहुणे… या नव्या मंचाच्या विचारानेच आम्हाला खूप उत्साहित वाटते आहे.”

जॅकलीन फर्नांडीसने नुकतेच इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर 90 मिलियनहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. तर, हॉलिवूड अभिनेत्री अमांडाचे देखील यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 45 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button