अभिनेत्री काजोलला कोरोनाची भीती नाही, विना मास्क फिरतेय बिनधास्त एअरपोर्टवर
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे…सामान्य लोकांपासून ते सिने तारकांसह सर्वांनीच याबाबतची काटेकोरपणे काळजी घेतली आहे…मात्र असं असताना अभिनेत्री काजोल व तिची मुलगी न्यासा काल एअरपोर्टवर दिसले. या मायलेकींच्या तोंडावर ना मास्क होता, ना हातात ग्लव्ज. कोरानाची इतकी दहशत असताना या मायलेकींनी कुठलीही काळजी न घेता विमानतळावर वावरताना पाहून लोकांनी दोघींचाही चांगलाच क्लास घेतला. त्यांचा हा निष्काळजीपणा पाहून लोकांनी दोघींनीही जाम फैलावर घेतले.
‘तुला काय गंमत वाटतेय. अख्खा देश ब्रेक घेऊन सरकारच्या पुढील घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. लोक घरात आयसोलेशनमध्ये असताना तू तुझी व तुझ्या टीमचा जीव धोक्यात घालते आाहेस. आता तरी काम बंद कर…,’ असे एका युजरने काजोल व न्यासाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना लिहिले. तर अन्य एका युजरने ‘हे लोक इतके अशिक्षितासारखे कसे वागू शकतात. हिची टीम तरी जास्त सतर्क दिसतेय,’ असे लिहिले आहे.
काही युजरनी तर ‘यांचीही कोरोना टेस्ट करावी,’ अशी मागणी केली आहे. अद्याप यावर काजोलची प्रतिक्रिया आलेली नाही. पण हो, इतक्या मोठ्या अभिनेत्रीने परिस्थिती एवढी नाजूक असताना इतका निष्काळजीपणा दाखवण खरोखरच योग्य नाही…