अभिनेता शरमन जोशीच्या वडिलांचे निधन
![Actor Sharman Joshi's father dies](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/sharman-joshi.jpg)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी याचे वडील आणि गुजराती सिनेमातील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते अरविंद जोशी यांचे आज नानावटी रुग्णालयात निधन झाले.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अरविंद यांची प्रकृती फारशी बरी नव्हती. वाढत्या वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वृद्धापकाळामुळे त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरविंद जोशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शरमन आणि मुलगी मानसी असा परिवार आहे.
वाचा :-अभिनेत्री धनश्री कडगांवकरला पुत्ररत्न
मानसीने लोकप्रिय टीव्ही आणि सिनेअभिनेता रोहित रॉय याच्याशी लग्न केलं आहे. तर शरमनने प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणाशी लग्न केलं आहे. दरम्यान, अरविंद जोशी यांनी गुजराती रंगभूमीवरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू सिनेमांमध्ये प्रवेश केला. त्यांनी ‘शोले’ आणि ‘इत्तेफाक’ इत्यादी हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. जोशी कुटुंबातील बरेचजण सिनेसृष्टीत सक्रिय आहेत.