breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या आवाजातील त्याचे पहिले वहिले गाणे कधी प्रदर्शित होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. त्याचे हे गाणे आज अखेर प्रदर्शित झाले आहे. ‘Unbelievable’ असे या गाण्याचे नाव असून सोशल मिडियावर हे गाणे सध्या खूप व्हायरल होत आहे. डान्समध्ये हातखंडा असलेल्या टायगरचा अद्भूत नृत्याविष्कार आणि सुरेल आवाज असलेल्या या गाण्याचा व्हिडिओ चाहते पसंत करत आहे. हे गाणे प्रदर्शित होताच अगदी काही वेळात 3 लाखांहून अधिक लोकांना हा व्हिडिओ पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी टायगरने या गाण्याचा टीजर देखील प्रदर्शित केला होता. तो टीजरही प्रचंड व्हायरल झाला होता.

बिग बँग म्युजिक प्रस्तुत हे गाणे आता युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये टायगर हातात माइक घेऊन रॉकस्टार अंदाजात गाणे गाताना दिसत आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये टायगरला एक मुलगी आवडते. तिच्या आठवणीत तो हे गाणे गाताना दिसत आहे.

या रोमँटिक गाण्याला टायगरने तितकेच रोमँटिक अंदाजात गायिले आहे. शिवाय यात त्याचा डान्स पाहून घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही . डीजी मायने आणि अवितोश यांनी हे गाणे लिहिले आहे. पुनीत मल्होत्रा आणि परेश यांनी मिळून हे गाणे दिग्दर्शित केले आहे.

टायगर श्रॉफ याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, लवकरच तो आपल्याला ‘हिरोपंती 2’ या चित्रपटात दिसेल. लॉकडाऊन आधी प्रदर्शित झालेला त्याचा ‘बागी 3’ हा सिनेमा लॉकडाऊनमुळे चांगली कमाई करु शकला नाही. मात्र त्याच्या आवाजतले हे गाणं ऐकूण त्यांचे फॅन्स अजूनच त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button