अभिनेता इंदर कुमारच्या ‘आत्महत्येचा’ व्हिडीओ व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/indar-kumar.jpg)
अभिनेता इंदर कुमारच्या निधनाला वर्ष होत आले आहे. मात्र आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इंदर कुमार आत्महत्या करणार असल्याचे स्वत: सांगत आहे. हा व्हिडीओ इंदर कुमारने मृत्यूच्या आदल्या दिवशी रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात आहे. इतकेच नाही तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचे फॅन्स इंदर कुमारने आत्महत्या केल्याचा दावा करत आहेत.
सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ या सिनेमात सहकलाकाराच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता इंदर कुमारचे गेल्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. इंदर कुमारने गेल्या वर्षी 28 जुलै 2017 रोजी अखेरचा श्वास घेतला. इंदर कुमार आजारी होता, त्याचवेळी मध्यरात्री त्याला हार्टअटॅक आला. आता त्याच्या निधनाला वर्ष होत आले आहे. मात्र त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंदर कुमारच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. इंदर कुमारला त्याच्या मृत्यूची जाणीव आधीच झाली होती असेही म्हटले गेले होते.
जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये इंदर कुमार दारुच्या नशेत स्वत:ची परिस्थिती सेल्फी कॅमेऱ्यात सांगत आहे. “माझी परिस्थिती पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल, घाबरला असाल. मात्र ही सत्य परिस्थिती आहे, मी आत्महत्या करायला निघालो आहे. याचा दोष मी कोणाला देऊ? चूक नव्हे अनेक चुका केल्या आहेत. मी नशेबाज, लंपट आज रस्त्यावर आलो आहे. मी सिक्सपॅक फाडू बॉडीसह अभिनेता बनण्यासाठी आलो होतो. मात्र माझ्या मस्ती/अय्याशीने रस्त्यावर आणलं.
माझ्या सल्ल्याने जर तुम्ही काही शिकू शकाल तर शिका, अन्यथा तुम्हीही रस्त्यावर याल. उद्या तुमच्या हातात मोबाईल असेल, तुम्हीही व्हिडीओ बनवत असाल, तुम्हीही मृत्यूचा संदेश देत असाल”. यानंतर इंदर कुमार पुन्हा दारु पिऊन हळवा होतो. त्यावेळी तो त्याच्या आईला संदेश देत आहे. आई तू मला सर्वकाही दिलंस. मात्र आता मी काहीही करु शकत नाही. मला माफ करा. आता छोटू (लहान भाऊ) तू मोठा भाऊ होशील. आता तर मी माफीलायकही राहिलो नाही.